प्रधानमंत्री आवास घरकुल योजने अंतर्गत मंजूर झालेल्या 952 लाभधारकांना तात्काळ रेती उपलब्ध करून द्या*
*प्रधानमंत्री आवास घरकुल योजने अंतर्गत मंजूर झालेल्या 952 लाभधारकांना तात्काळ रेती उपलब्ध करून द्या*
*गजानन पाटील चव्हाण*
सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज नांदेड नायगाव मो,9604500201
महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे व आज रोजी ग्रामीण भागासाठी लाभधारकासाठी आपल्या स्तरावर दिलेल्या आदेशा नुसार
आज रोजी नायगाव शहरातल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रधानमंत्री आवास घरकुल योजने च्या लाभधारकां चे बांधकाम सुरू करून जवळपास एक वर्ष होत आहे आणि लाभधारकांना वेळेवर रेती मिळत नसल्या कारणाने बांधकाम रखडलेले आहे
तसेच रेती न मिळणे वेळेवर या बाबीचे विविध कारणे आहेत याची जाणीव सर्व नागरिकांना आहे पण आपल्या शासनाने महसूल प्रति ब्रास आज रोजी 4300 व 18 टक्के जीएसटी दहा टक्के डी डी अशाप्रमाणे महाराष्ट्र शासन महसूल वसूल करत आहे म्हणून सर्वात जास्त त्रास व खिशाला पिळवणूक गोरगरीब कामगार ,मजदूर, मध्यमवर्गीय व्यापारी बांधव, मध्यमवर्गीय कुटुंब, यांच्या खिशाला आर्थिक नुस्कान होत आहे आणि आज रोजी प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या लाभधारकांची चे बांधकाम रखडलेले आहेत रेती अभावी सर्वे कामे ठप्प आहेत आणि सन वर्ष 2018 व 19 अठरा-एकोणीस मध्ये भाजपा सरकारने तथा महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णया प्रमाणे प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या लाभधारकांना अति तात्काळ रेती उपलब्ध करून देण्यात यावे
आपल्या अंतर्गत आम्ही दिलेल्या निवेदनाप्रमाणे मा. जिल्हा अधिकारी साहेब मा उपजिल्हाधिकारी साहेब मा तहसीलदार साहेब नायगाव यांच्याकडे शिफारस करून तात्काळ आदेश मागून घ्यावेत आणि नायगाव शहरातल्या तमाम प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या लाभधारकांना रेती उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे निवेदक सौ पार्वती शंकरराव पाटील चव्हाण भाजपा नगरसेविका, देवीदास पाटील बोमंनाळे नगरसेवक नायगाव, गजानन शंकरराव पाटील चव्हाण, शेख तबस्सुम फातेमा नगरसेविका नायगाव, रघुनाथ दादा सोनकांबळे सामाजिक कार्यकर्ता, प्रा. डॉ. जीवन पा चव्हाण, गंगाधर पाटील कल्याण, भाऊराव पाटील चव्हाण, हरिचंद्र पा चव्हाण, संजय पा चव्हाण, कैलास सुभाष भालेराव, माधव शंकर कल्याण, सय्यद यजजा, राजेंद्र सोनकांबळे, माधव वसंत चव्हाण, चंद्रकांत पा तमलुरे, प्रदीप देमेवार, अतुल पा मंगरुळे, अविनाश चव्हाण, संजय भाऊ गुजलवार, सह सह्या करून मागणी करण्यात आली आहे
सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज नांदेड नायगाव
