५ वर्षाच्या कु गौरी सूर्यवंशी हिच्या वाढदिवसा निमित्त वडील विनोद सूर्यवंशी 3000/- यांनी गरीब,बेघर, शिक्षणापासून वंचित, आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी सुरू होत असल्याल्या "खुशी ग्राम प्रकल्पाला" मदत स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला
किल्लारी- वाढदिवस म्हटला की हार तुरे,केक, स्वागत समारंभ असा कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो. मात्र कोरोनाच्या संकट काळात या खर्चाला फाटा देत श्री विनोद सूर्यवंशी यांनी भविष्यात आपल्या मुलांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यास हातभार लावावे अशी शिकवण दिली.
