नांदेड येथील कोरोना रुग्णाचा मृत्यू ही अफवा- जिल्हाधिकारी डॉ बिपीन.
नांदेड येथील कोरोना रुग्णाचा मृत्यू ही अफवा- जिल्हाधिकारी डॉ. बिपीन
नायगाव(प्रतिनिधी) कानोले,एस,जि जनतेने घाबरुन न जाता घरातच राहून आरोग्य कर्मचारी व प्रशासनास सहकार्य करावे ; आतापर्यंत 444 नमुने निगेटीव्ह ; 50 नागरिकांचा तपासणी अहवाल बाकी नांदेड कोरोना रुग्णाची प्रकृती ठीक आहे त्यांच्या वर उपचार चालू आहेत. होत असलेल्या अफ़वावर विश्वास ठेऊ नये अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांनी दिली व जनतेला आव्हान केले. नांदेड दि.२२ एप्रिल: शहरात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले असतानाच, या रुग्णाचा मृत्यू झाला अशी अफवा दुपारी दोन वाजल्यापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवली जात आहे. कोरोना रुग्ण जीवंत आहे त्यांच्या वर उपचार चालू आहे. होत असलेल्या अफ़वावर विश्वास ठेऊ नये असे माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांनी दिली व जनतेला आव्हान केले. हा रुग्ण सोमवार 20 एप्रिल 2020 रोजी दुपारी शासकीय महाविद्यालय नांदेड येथे ताप खोकला व दम लागणेच्या तक्रारीमुळे दाखल झाला होता. या रुग्णावर उपचार सुरु आहेत. प्रशासनाने खबरदारी घेत पिर बुऱ्हान भागातील सर्व परिसरात सनीटायजर ची फवारणी करून प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने पाच कि.मी. परिसर सील करण्यात आलेल्या भागातील जनतेने घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सील केलेल्या भागात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संभावित संशयीतांच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथके आणि पोलिस तैनात करण्यात आली आहे. रुग्णाच्या परिवारातील 14 सदस्यांना एनआरआय निवास येथे ठेवण्यात आले आहे. मनापाच्या आरोग्य विभागाने त्या व्यक्तींची चौकशी केली असून त्या व्यक्तीच्या संपर्कातील 50 व्यक्तींना एनआरआय निवास कोव्हीड-19 केअर सेंटर येथे क्वारंटाईन केले असून त्यांचा स्वॅब तपासणीचे नमुने पाठविले आहे. नियमानुसार पिरबुऱ्हाणनगर व लगतचा परिसर सहयोगनगर, अशोकनगर, भाग्यनगर, वृंदावन कॉलनी, उदयनगर, शास्त्रीनगर, टिळकनगर, विद्युतनगर, अंबेकरनगर व इंदिरानगर या क्षेत्रामध्ये रोगाचा इतरत्र प्रसार होऊ नये म्हणून हे क्षेत्र कन्टेनमेंट झोन (Containmet Zone) म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तेथील नगारिकांच्या हालचालीवर बंधने घालण्यात आली आहेत. कोणत्याही नागरिकांने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांमध्ये नमुद केल्यानुसार अत्यावश्यक कामाशिवाय, वैध कागदपत्राशिवाय व आवश्यक कारणाशिवाय तसेच मास्क न घालता बाहेर निघाल्यास त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनीय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या 754 आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 242 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 65 नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 119 नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 635 अशी संख्या आहे. आज तपासणीसाठी 51 नागरिकांचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकुण 500 नमुने तपासणी झाले आहेत. यापैकी 444 नमुने निगेटीव्ह आले असून 50 नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तसेच 5 नमुने नाकारण्यात आली आहेत. जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 78 हजार 150 असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड यांनी दिली आहे. जनतेने घाबरुन न जाता घरातच राहून सहकार्य करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन करण्यात आले आहे.
