पिंपरीचिंचवड मध्ये आज दोन कोरोना पॉझिटीव्ह ....!
पिंपरीचिंचवड मध्ये आज दोन कोरोना पॉझिटीव्ह ....!
पिंपरी : पिंपरीचिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहिती नुसार आज ( ता.२३ गुरुवार ) दिवसभरात निगडी रुपीनगर परिसरातील २६ वर्षाच्या तरुणाला व शहराबाहेरील आणखी एका तरुणाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आज स्पष्ट झाले. त्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. दोघांवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या ६९ वर पोहचली आहे. त्यापैकी २१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज घरी सोडलेला रुग्ण भोसरी परिसरातील आहे आजपर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालयात ३७ तर शहरातील ९ रुग्णांवर न न पा हद्दीबाहेरलरील रुग्णालयात उपचार सुरू आहेत .
