सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

कर्जत शहर भाजपाच्यावतीने मोफत नमो थाळी

कर्जत शहर भाजपाच्यावतीने मोफत नमो थाळी



 -शहराध्यक्ष वैभव शहा. प्रतिनिधी कर्जत. करोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व सर्वसामान्य जनतेचे होणारे हाल पाहून माणुसकीच्या भावनेतून भारतीय जनता पार्टी कर्जत शहर यांच्यावतीने गरजू व्यक्तींना जेवण व्यवस्था सुरू. या नमो थाळी भोजन व्यवस्थेचे उद्घाटन प्रथम नगराध्यक्ष नामदेव देवा राऊत यांच्या हस्ते करण्यात आले असे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष वैभव शहा यांनी सांगितले. शासकीय व वैयक्तिक कामासाठी आलेल्या तालुक्यातील जनतेची लॉक डाऊन मुळे जेवणाची गैरसोय होते आहे .परिणामी अशा व्यक्तींना भोजना पासून वंचित राहावं लागत आहे. हे लक्षात घेऊन शहर अध्यक्ष वैभव शहा यांच्या संकल्पनेतून भाजपा कर्जत शहराच्या वतीने नमो भोजन चालू करण्यात आले आहे. सकाळी साडेअकरा ते दीड या कालावधीमध्ये मोफत भोजनाची व्यवस्था महाविर चौक बाजारतळ कर्जत येथे करण्यात आली आहे .दिनांक 22 एप्रिल ते 13 मे 2020 पर्यंत हा उपक्रम चालू राहणार आहे. नमो भोजनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रथम नगराध्यक्ष नामदेव देवा राऊत ,प्रसाद ढोकरीकर ,उमेश जेवरे , सुजय दादा विखे साहेबांच्या वतीने त्यांचे पीए देशमुख साहेब ,कर्जतचे कापड व्यापारी अभय शेठ बोरा, सुनील निलंगे सुवालालजी छाजेड. प्रसन्न भंडारी व अनेक मान्यवर उपस्थित होते प्रथम दिवशीच्या भोजनाचे संयोजक अभय शेठ बोरा हे होते. या प्रसंगी नामदेव राऊत यांनी आपल्या भाषणा मध्ये या कार्यास शुभेच्छा दिल्या व नमो भोजन या उपक्रमा करिता लागणाऱ्या मदती साठी मी सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com