पालकमंत्रानी टेलीकॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद .
पालकमंत्रानी टेलीकॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद .
लातूर प्रतिनिधी-आजवर आपल्या सर्वांच्या परिश्रमातून लातूर जिल्हा कोविड १९ मुक्त राहिला आहे. यापुढेही तो सुखरूप ठेवायचा आहे, असे सांगून पदाधिकारी यांनी तुम्ही आपले गाव राखा मी चोवीस तास आपल्या मदतीसाठी सज्य आहे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतीक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी सकाळी लातूर जिल्ह्यातील सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी टेलीकॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. लॉकडाऊन– २ संदर्भाने माहिती दिली त्यांच्याकडून गावपातळी पर्यंतची माहिती घेतली, समस्या जाणून घेतल्या, त्या सोडविण्याचे आश्वासन देऊन धीर दिला. गावपातळीवर पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी अगदी सहजतेने संपर्क साधताना अदयाप लढा संपलेला नाही,तरी सतर्क राहणास सांगितले. सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज लातूर.
