*लॉकडाउनच्या काळात अमळनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारूची विक्री*
*लॉकडाउनच्या काळात अमळनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारूची विक्री*
*प्रतिनिधी जळगाव* मागील गेल्या 1 महिन्यापासून लॉकडाउन मुळे सर्वच व्यवहार व दुकानें बंद आहेत. त्यात सर्वात मोठी हानी दारू पिणाऱ्यांची झाली आहे. अशातच अमळनेर तालुका व संपूर्ण जळगाव जिल्ह्यात बनावट व विषारी दारू मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. त्यामुळे दारू पिणारे व्यसनाधीन मंडळी अशाप्रकारची दारू महागात विकत घेऊन आपला शोक पूर्ण करताय. प्रशासन कोरोना ग्रस्थ भागात अडकल्यामुळे बनावट दारू विक्रेते भन्नाट दारू विकत आहेत, भविष्यात याचा भयंकर परिणाम या व्यसनी मंडळींच्या आरोग्यावर होईल. तरी या बनावट दारूला प्रशासनाने जिल्ह्यातून हद्दपार करावी असा आवाज सर्व सामान्य जनतेतून येत आहे. प्रा. सुनिल पाटील प्रतिनिधी जळगाव जिल्हा