सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

आमदार लक्ष्मण जगताप यांचे मार्गदर्शन ठरले लाखमोलाचे

आमदार लक्ष्मण जगताप यांचे मार्गदर्शन ठरले लाखमोलाचे ....!



 सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज ता.२१ नवी सांगवी : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लॉक डाऊन आणखी ३ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ प्रतिष्ठान नवी सांगवी यांच्या वतीने अध्यक्ष ललित म्हेसेकर आणि प्रतिष्ठान च्या महिला दीपाली कुलकर्णी,ऐश्वर्या कल्याणी , भावना पाटील अमृता कुलकर्णी,प्रणाली मूलटकर,गायत्री कल्याणी यांनी घरगुती बनविलेले ७५०मास्क आपल्याच परिसरातील गरजू आणि गरीब नागरिकांना मोफत वाटण्यात आले,हे मास्क महिलांनी स्वतः बनविले असून या फावल्या वेळात कोणताही मोबदला न घेता त्यांनी ही सेवा केली असल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने आपल्या भागातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे व देशावर आलेल्या या कोरोनाच्या संकटातून सर्वांनी लवकरात लवकर बाहेर पडावे यासाठी सर्वांनी घरातच राहवून सोसिअल डिस्टन्स पाळावे असे आवाहनही ललित म्हसेेंकर यांनी यावेळी सर्वांना केले,आमदार लक्ष्मण जगताप यांचे नेहमीच कौतुकाची थाप आणि मोलाचे सहकार्य आम्हाला लाभते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com