पेराल ते उगवेल
" *पेराल ते उगवेल
* "
*डॅा.दत्ता कोहिनकर*
(व्याख्याते) 🎤
लेखक-(मनाची मशागात)©
Mob.9822632630
एका माणसाने खूपच भावनाविवश होऊन रडत रडत वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांना मुक्ती मिळण्यासाठी भगवान बुद्धांकडे आग्रह धरला. बुद्धांनी त्या माणसाला दोन मडकी आणून एका मडक्यात तूप व एका मडक्यात खडी भरावयास लावली. त्या दोन्ही मडक्यांना तलावात ठेवून काठीचा प्रहार करावयास लावले. मडकी फुटली - तुप तरंगले व खडी पाण्याखाली गेली. बुद्ध त्या व्यक्तीला म्हणाले आता तुला जे कर्मकांड करावयाचे ते कर. ज्यावेळेस ही खडी वर येईल व तूप खाली जाईल त्यावेळेस झटकन तुझे वडील मुक्त होतील. तो बुद्धांकडे पाहत गोंधळलेल्या स्वरात म्हणाला *भगवान पण ही खडी जाड वजनदार ती पाण्यावर कशी येणार? हे तूप हलके - फुलके हे खाली कसे जाणार*?. निसर्गनियमानुसार हे होऊच शकत नाही. त्यावेळेस हसत भगवान बुद्ध म्हणाले, तुझ्या पित्याने या तुपासारखे हलके-फुलके सत्कर्म केले असेल तर ते वरच म्हणजे सतगतीला जाणार व या दगडांसारखे जड (त्रासदायक) काम केले असेल तर ते खालीच (अधोगतीलाच) जाणार. हाच निसर्गाचा नियम आहे.
*मित्रानो नेहमी सतकर्म करा व सुखाचे अधिकारी व्हा*
क्रांतीसूर्य महात्मा फुले म्हणाले होते , जगात सगळीकडे दुःखच दुःख आहे . प्रत्येकाने आपल्या सभोवतालच्या एकाच दुःख जरी दूर केल तरी फार मोठ काम होऊ शकत .
स्वामी विवेकानंद म्हणाले होते , " *शिवभावे जीवसेवा करा*".
बंधु भागिनींनो लॉक डाऊनच्या या काळात शासनाचे सर्व नियम पाळत गरजवंताना मदत करा. दिवस बदलतात . *आज जे पेराल तेच उद्या उगवणार आहे . मित्रांनो भारतातील एकही माणूस उपाशीपोटी झोपणार नाही , किंवा औषध न मिळाल्याने अस्वस्थ होणार नाही यासाठी आज भारतमातेने आपल्यावर जबाबदारी टाकलीय .लॉकडाऊन लवकरच संपेन . भारत पुन्हा महासततेच्या दिशेने झेप घेईन . कारण भारत हा संताचा , ऋषीमुनींचा , बुद्धांचा देश आहे . हीच वेळ आहे भारतमातेच्या सेवेची . शासनाचे सर्व नियम पाळून आपापल्या पद्धतीने आपल्या बांधवाना व सरकारला मदत करा . हीच वेळ आहे देशसेवेची .वंदेमातरम*
https://youtu.be/PVthNbAw1sE
*जनहितार्थ पुढे पाठवा* .