जिल्हा सीमाबंदी फक्त कागदावरच
जिल्हा सीमाबंदी फक्त कागदावरच
लातूर-कोरोनाच्या। संसर्ग थांबविण्यासाठी जिल्हा बंदीच्या फक्त घोषणाच होत असून प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र शुन्य असल्याचे चित्र लातूर जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे. जिल्ह्याच्या सीमा कडेकोट बंद करा अशा सक्त सुचना पालकमंत्री आणि जिल्हाअधिकारी वारंवार देत असले तरी याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. कारण सोमवारी पुणे,मुंबई, हैद्राबाद येथून आलेल्या उदगीर शहरातील 20 ते 25 नागरिकांनी रूग्णालयात येवून स्वतःची चाचणी केली. त्या नंतर हाळी येथे अंत्यविधीसाठी पुणे आणि मुंबई हुन 10 ते 15 नातेवाईक उपस्थित होते. तसेच मंगळवारी लातूरमध्ये एका कारला अपघात झाला,ही कार उस्मानाबाद जिल्ह्यातून आलेली होती. यावरून जिल्ह्याच्या सीमेवरील नियंत्रण कुचकामी आहे हे सिद्ध होते. सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज लातूर जिल्हा प्रतिनिधी.
