पिंपरीचिंचवड शहरातील आणखी एक महिला कोरोना पॉझिटीव्ह
पिंपरीचिंचवड शहरातील आणखी एक महिला कोरोना पॉझिटीव्ह
....! पिंपरीचिंचवड:– पिंपरी चिंचवड शहरातील आणखी एका ५५ वार्षीय महिलेचे रिपोर्ट पॉझिटीव्ह ( २१ एप्रिल )आले आहेत. त्यामुळे या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवसभरात दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ४५ वर पोहचली आहे तर आजपर्यंत ६४ जणांना कोरोनाची लागण झाली असून १८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, दोघांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील या महिलेचे नमुने तपसाणीसाठी एन आय व्ही कडे पाठविण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट आले असून या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, पुण्यातील एका भागातील राहणा-या आणि पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल असलेल्या एका २७ वर्षीय तरुणाचे सकाळी रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. आता या महिलेचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने आज दोघांना कोरोनाची लागण झाली आहे .
