रात्री २:२० वाजता लागलेल्या आगीवर अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर नियंत्रण.
रात्री २:२० वाजता लागलेल्या आगीवर अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर नियंत्रण.
लातूर प्रतिनिधी- लातूरकरांनी आग लागण्याच्या घटना घडू नयेत याकरिता लॉक डाऊन काळापासून बंद असलेली दुकाने, व्यापारी संकुले यांचा मुख्य विद्युत पुरवठा बंद ठेवावा. मागील दोन दिवसातील दुसरी घटना. आज दिनांक 23 एप्रिल रोजी रात्री 2:25 वाजता उद्योग भवन परिसरातील संकल्प बुक डेपो ( डॉ नरेंद्र पाटील यांची इमारत), एम बी एफ बायो फर्टीलायजर कार्यालय खालील दुकानास शॉर्ट सर्किट मुळे लागलेली आग मनपा अग्निशमन विभागा च्या जवानांनी सुमारे 2:30 तासाच्या अथक प्रयत्नानंतर नियंत्रणात आणली. लॉक डाऊन काळापासून बंद असलेली दुकाने, व्यापारी संकुलाचा मुख्य विद्युत पुरवठा बंद ठेवणे आवश्यक आहे. मागील दोन दिवसातील ही दुसरी घटना असून सुदैवाने कसलीही जीवित हानी झाली नाही. परंतु तरीही प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज लातूर.
