सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

काळेवाडी नढेनगर मध्ये भाजी व्यापाऱ्यांचा रात्रीस नागरिकांच्या जीवाशी खेळ ..! प्रशासनाचे दुर्लक्ष ....

काळेवाडी नढेनगर मध्ये भाजी व्यापाऱ्यांचा रात्रीस नागरिकांच्या जीवाशी खेळ ..! प्रशासनाचे दुर्लक्ष ....



 ता.२३ पिंपरी : कोरोनाच्या या संकटामध्ये पिंपरीचिंचवड हे रेड झोन मध्ये गेले आहे यामुळे प्रशासनाने काठोर पावले उचलली आणि संपूर्ण पिंपरीचिंचवड शहर कॅटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले या गोष्टीची कल्पना नागरिकानाही दिली आहे ,भाजीपाला विक्रीची ठिकाणे आणि वेळही ठरवून दिली आहे ,तरी पिंपरीचिंचवड महानगरपालिका हद्दीतील काळेवाडी नढे नगर येथील स्वराज कॉलनी येथे काही आठ दहा व्यापारी मिळून दमदाटी, दादागिरी करत नागरिकांच्या जीवाशी खेळत, सोसिअल डिस्टन्स ला हरताळ फासत रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत भाजी मंडई भरवत आहेत नागरिकही भाजी घेण्यासाठी गर्दी करताना आढळून आले ,आजूबाजूच्या नागरिकांनाही नाहक त्रास होत आहे, या सर्व गोष्टीकडे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे ,पोलीस येऊन जुजबी कारवाई करून निघून जातात,असेही येथील नागरिकांचे म्हणणे आहे .या सर्व गोष्टींतुन नागरिकांच्या जीवास मोठा धोका झाल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत .
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com