सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

भारतीय बौद्धमहासभा व भारीपच्या वतीने येवला शहरात अपंगांना भाजीपाला व किराणा वाटप करून दिला आधार

भारतीय बौद्धमहासभा व भारीपच्या वतीने येवला शहरात अपंगांना भाजीपाला व किराणा वाटप करून दिला आधार




 सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज नाशिक जिल्हा .येवला प्रतिनिधी : - विजय खैरनार येवला, ता.२३: येतील येवला मुक्तीभूमी या ठिकाणी भारतीय बौद्धमहासभा व भारीपच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सच्या नियम व शिस्तीचे पालन करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा कहर सुरू असताना अनेक सर्वसामान्यांचे रोजगार बुडाल्यामुळे उदरनिर्वाहाचे प्रश्न निमार्ण झालेले आहेत,हवालदिल झालेल्या सर्वसामान्य जनतेच्या तोंडचे पाणी पळाले असून ऐन उन्हाळ्या हंगामात प्रखर उन्हाचा कहर आणि अशातच सर्वसामान्यांसोबत दिव्यांगावरसुद्धा अक्षरशः उपासमारीची वेळ निमार्ण होण्याची परिस्थिती येऊन ठेपली आहे.हातावर पोट असणारे मोलमजुरी करणारे,छोटे गृहउद्योग करणारे घरेलू कामगार,मजूर बेरोगारीच्या सावटाने हातास झाले आहेत अशातच कुटुंबातील अंध,अपंग गरजूंना सांभाळणे जिकरीचे झाले असतांना परिस्थितीचे गांमभिर्य लक्षात घेऊन येवला शहरातील अशा गरजू दिव्यांगांना भाजीपाला व किराणा वाटप करून आधार दिला आहे.कोरोनाचे महायुद्ध जिंकण्यासाठी स्वच्छतेचे महत्व पटवून देत मानवीमूल्य जोपासण्याची नैतिक जबाबदारी उचलली आहे.कोरोनाला हरविण्यासाठी घरीच राहणे हा एकमेव जालीम उपाय उरला असतांना ओढवलेल्या सध्यपरिस्थितीवर मात करण्यासाठी येवला तालुका व शहरातील अनेक सेवाभावीवृत्तीचे समाजसेवक तसेच सेवाभावी संस्था पुढे येऊन अन्नदान व किराणा ,रेशन वाटप करत आहेत.हातावर पोट असणाऱ्या गरजूंना मदत करत आहेत ह्या सर्वांचे कौतुक करत आंबेडकरी चववळीच्या वतीने मानवीहीतासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व बांधवांचे आभारही व्यक्त करण्यात आले.अंध,अपंगांना भाजीपाला व किराणा वाटपासाठी भारतीय बौद्धमसभेचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब जाधव,भारीपचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब अहिरे,नवचेतना ऍकॅडमीचे संचालक प्रा.जितेश पगारे,भाऊसाहेब झालटे,अमोल पगारे,कडूभाऊ गरुड,दीपक गरुड,अमित भावसार,सलिम काझी या सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन लॉकडाऊन काळात मदतीसाठी एकपाऊल पुढे टाकले आहे.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com