सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

दोन हजार परिवाराला मोफत धान्य वाटप

दोन हजार परिवाराला मोफत धान्य वाटप



. लातूर-सबंध भारतात, महाराष्ट्रात कोरोना रोग पसरलेला असून त्यामुळे मजूरीवर आधारित असलेल्या सर्वसामान्य जनतेला कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अनेक हातावर पोट असणार्‍या गरीब लोकांची हालाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचे भान ठेवून, मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सक्षम व दानशूर संस्था व्यक्‍तीने पुढे यावे, असे आवाहन केले होते, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कव्हेकर परिवाराच्या वतीने प्रभाग 18 मधील गरजू व मजूर, कष्टकर्‍यांच्या दोन हजार परिवाराला मोफत धान्य वाटप करण्यात आले तसेच अत्यंत गरजू परिवारापर्यंत हे किट पोहचणार आहे. व गरज नसल्यास, ज्या केशरी व पिवळ्या रेशन कार्ड धारकांनी किराणा दुकानामार्फत धान्य घेतले आहे, अशा परिवारांनी हे किट न स्विकारता ज्यांची हालाखीची परिस्थिती आहे त्यांच्यापर्यंत हे धान्य किट पोहचवण्यामध्ये मदत करावी,असे नम्र आवहान नगरसेवक अजित शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले आहे. या धान्य किट वाटपाचा शुभारंभ नुकताच प्रभागात करण्यात आलेला असून या प्रभागातील मजगे नगर,पिनाटे नगर, माताजी नगर,शंकरपूरम नगर,कव्हा रोड,नंदनवन कॉलनी, पटेल नगर, संभाजी नगर, कातपूर रोडसह संपुर्ण प्रभागातील गरीब कुटुंबाना त्याच्या दारात जाऊन हे धान्यकिट देण्यात आलेले असून सदरील धान्य किट घेतांना कोरोना नियम व समांतर अंतर पाळून सर्वांनी सहकार्य करावे, असे मतही अजित पाटील कव्हेकर यांनी शेवटी बोलताना व्यक्‍त केले. सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज लातूर जिल्हा प्रतिनिधी.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com