केंद्रीय पथक मुंबईत दाखल झाले असून त्यांच्या अनुमानानुसार मुंबईत 30 एप्रिलपर्यंत 42,000 आणि 15 मे पर्यंत 6.5 लाख लोक करोना बाधित होणार आहेत
केंद्रीय पथक मुंबईत दाखल झाले असून त्यांच्या अनुमानानुसार मुंबईत 30 एप्रिलपर्यंत 42,000 आणि 15 मे पर्यंत 6.5 लाख लोक करोना बाधित होणार आहेत
त्यामागील कारणे अशी की... 1) करोना संक्रमित असल्याने सतत रस्त्यावर फिरणार्रामुळे परिसरात, इमारतीत तसेच घराघरात पोहचत आहे. 2) फिरून घरी आल्यावर कोणीही आंघोळ किंवा साबणाने हातपाय व चेहरा धूत नाहीत. 3) घराबाहेर जाण्यासाठी वापरलेले कपडे घरी आल्यावर लगेच धुवून काढत नाहीत. तेच कपडे व मास्क पुन्हा वापरले जातात. 4) वायरसची साखळी तोडण्यासाठी एकदा घराबाहेर पडल्यानंतर पुन्हा 3-4 दिवस घराबाहेर पडायचे नसते. तरीही लहानसहान कामासाठी वारंवार घराबाहेर पडतात. 5) भाजीपाला, फळे घरी घेऊन आल्यावर तो काही वेळ गरम पाण्यात भिजवून नंतर सुकवायचा आहे. तसेच भाजीची पिशवी लगेच साबणाने धुणे आवश्यक आहे. पण यापैकी काही केले जात नाही. 6) किराणा माल तसेच रेडीमेड खाद्यपदार्थ घरी आणल्यावर 1-2 दिवस हाताळू नयेत. पण त्याचे भान कोणीही ठेवत नाही. 7) अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीस, बाजारात जाताना मास्कबरोबर हातात ग्लोव्हज घालणे आवश्यक आहे, पण त्याकडे लक्ष देत नाहीत. 8) वयस्कर व आजारी माणसे तसेच लहान मुलांना घराबाहेर पाठवणे धोक्याचे आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 9) सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टंटींगचे नियम पाळले जात नाहीत. मुंबईतील लोक अशा अनेक गोष्टींची काळजी व आवश्यक खबरदारी घेत नसल्याने मुंबईत वेगाने करोना वायरस पसरणार हे केंद्रीय निरिक्षण पथकाचे भाकीत केले आहे. आपला नम्र श्री. स्वप्नील राणे सुपर फास्ट न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी ( कल्याण डोंबिवली )
