21दिवसात तिन हजार कुटूंबांना मदत* ........
*21दिवसात तिन हजार कुटूंबांना मदत* ........
*नामदेव भोसले,* *दौंड* दि,23/04 गेली काही दिवसांपासुन देश कोरोना मुळे लाॅकडाउन आहे अचानक सर्व काही व्यवहार थांबल्यामुळे देशातील व सर्व राज्यातील हातावर पोट रोटी साठी घराभाहेर पडणारे व रोज कांम केले तरच ज्याची चुल पेटत होती अशा गोर गरीब कुटुंबाची परिस्थिति या बंद मुळे आणी रोजंदारी थांबल्यामुळे गाव कुसाबाहेर जंगलात, वणात, डोंगराळ भागात, रहात असलेल्या गरीब आदिवासी लोकांची उपासमार होण्यास सुरुवात झाली , अशात पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मा .श्री संदिप पाटिल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेवराई सेवाभावी संस्थेच्या माध्यमातुन गरीब कुटुंबाना मदत करण्यासाठी घर सोडुन गेले काही दिवसांपापुन काम करत आहेत, प्रत्येक गावातील वाडी वस्तीवर जाऊन गरीब, शोषित, पिढीत, आदिवासी बंधूभगीनींना घर पोच एक महिना पुरेल एवढा बाजार घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले,अशात काही तालुक्यालील महसुल विभागाकडुन व पोलिस स्टेशनच्या माध्यमातुन लोकांपर्यत घरपोच धान्य व बाजार देण्यात येत आहे,पुणे जिल्हयाचे जिल्हाधिकारी मा.श्री नवल किशोर राम साहेब व पुणे ग्रामीणचे पोलीस आधिक्षक मा .श्री संदिप पाटील साहेब हे अहोरात्र काम करत आहेत अशात मा.श्री संदिप पाटिल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पुणे जिल्हयात प्रत्येक आदिवासी कुठूब उपासी झोपनार नाही या संकल्पनेतुन काम करत असताना गेले 21दिवसात "तीन हजार, आदिवासी गरीब कुटूंबाना काही दानशुर व्यक्तींच्या मदतीमुळे शेवराई सेवाभावी संस्था चे अध्यक्ष मा .नामदेव भोसले हे जिल्हयातील आदिवासी पालावंर, वाड्या, वस्तीवर जाऊन एक महिना पुरेल असा बाजार घर पोच तीन हजार कुटूंबाना देण्यात आला आहे, आत्तापर्यंत पिडीतांच्या दु:खात सहभागी होऊन व त्यांचे दुःख दूर करु अशा संकल्पनेतुन नामदेव भोसले व त्यांचे सहकारी आहो रात्र काम करत आहे...... प्रत्येकान आपल्या गावातील वाड्या वस्तीवरील व शेजारील एकही कुटूंब उपाशी झोपणार नाही अशी संकल्पना राबवली तर कोणीच उपाशी झोपणार नाही .. काल दौड़ तालुक्यालील पाटस गाव येथे काही आदिवासी कुटूंबाला एक महीना पुरेल एवढा बाजार वाटप करताना आदिवासी समाजसेवक, नामदेव भोसले व पी .एस .आय. मा.श्री घाडगे साहेब, ए .एस. आय.मा .चव्हाण साहेब, आणि पाटस गावचे तलाठी एस.दिवेकर, नितीन शिंदे,आदेश भोसले,आकाश शिंदे , सुनिल भोसले इत्यादी उपस्थित होते.
