*मा. मंत्री डॉ. सतिष पाटीलांच्या नदीजोड प्रकल्यामुळे 15 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला
*मा. मंत्री डॉ. सतिष पाटीलांच्या नदीजोड प्रकल्यामुळे 15 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला*
प्रतिनिधी जळगाव - गिरणा धारणेतून डाव्या जामदा कालव्याने सार्वे, बाहुटे पाटचारीने पिण्यासाठी पाणी सोडल्याने 15 गावांचा पिण्याच्या पाण्यासह गुरेढोरांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. माजी पालकमंत्री डॉ. सतिष पाटील यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात नदीजोड प्रकल्प जळगांव जिल्ह्यात यशस्वी करीत अनेक योजना अंमलात आल्याने त्याचे फलित किंवा फळ आज जनतेला मिळत आहे. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पारोळा तालुक्यातील गावांची पाणी टंचाई पाहता. 2009 साली पाठपुरावा करून गिरणेतुन पाटाचारी तयार करण्यात आली. गेल्या 10 वर्षांपासून या पातचरित पाणी सोडण्यात येते. ही पाटचारी अनेक अडथळे दूर करून तयार करण्यात आली होती. आज या पाटचारित गिरणेतुन आवर्तन सोडल्याने बाहुटे, बाभळेगाव, सार्वे, सांगावी, पळासखेडे, इटवे ई. तसेंच धरणगाव तालुक्यातील भवरखेडे, विवरे, बोरगावसह अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. पूर्वी या गावांना नेहमी पाणी टंचाई भासत असे, परंतु आज पिण्याच्या पाण्याबरोबर गुरेढोरे यांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तसेच विहिरींच्या पाण्याच्या पातळीत देखील वाढ झालेली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी मा. मंत्री सतिष पाटील यांचे आभार मानून समाधान व्यक्त केलेलं आहे प्रा. सुनिल पाटील, प्रतिनिधी, जळगाव जिल्हा.
