मास्क न घालणा-यांकडून महापालिकेनं केला 13 हजार 100 रूपयांचा दंड वसूल
मास्क न घालणा-यांकडून महापालिकेनं केला 13 हजार 100 रूपयांचा दंड वसूल
. लातुर :- लातुर शहरात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने काही बाबतीत लातुर कोरोना मुक्त असल्याने जीवनावश्यक वस्तू, शेती युक्त व्यापारी दुकाने, आडत बाजार, मेकॅनिकल दुकाने चालू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र लातूर चालू झाले असे अनेक समज-गैरसमज करुन काहीजण बिनधास्त रस्त्यावर फिरतांना दिसत आहे. म्हणून लातुर महानगर पालिका आयुक्त व सह आयुक्त फड यांच्या आदेशावरुन क्षेत्रीय आधिकारी संजय कुलकर्णी यांच्या पथकाने रस्त्यावर फिरणा-या पण मास्क किंवा रुमाल तोंडाला न बांधणा-या लोकांविरोधात दंडाची कारवाई करुन 13 हजार 100 रुपयांचा दंड वसुल केला आहे. यावेळी स्वच्छता निरीक्षक अक्रम शेख, एस आर मोरे, पंडित गोरोबा, पवार, सुरेश कांबळे, संतोष फिस्के, वैराग्य उपस्थित होते . त्यानी दंडाची कारवाई सुरू केल्यानंतर आता रस्त्यांवर नागरिक मास्क लावून फिरत आहेत. सुपरफास्ट महाराष्ट्र न्युज लातूर जिल्हा प्रतिनिधी.
