येस बँकेला धूत बंधूनी लावला ४५ हजार कोटी रुपयांचा चूना औरंगाबाद, १२ मार्च( सुपर फास्ट महाराष्ट्र न्यू
व्हिडिओकॉन कामगारांनी कामगारांच्या पगारासाठी व बँक वाचवण्यासाठी ६ महीन्यांपेक्षा जास्त काळापासून प्रदीर्घ लढा सुरु ठेवला आहे. चंदा कोचर, राणा कपूर यांना अटक होते. परंतु ज्यांनी कर्ज घेवून या बँकांना बुडवले व सर्वसामान्यांच्या कष्टाचे कमाईवर डल्ला मारला. आता व्हिडिओकॉन कंपनीचे मालकाने येस बँकेला ४५ हजार कोटी रुपयांचा चूना लावल्याचे उघड झाल्याने अगोदरच ५८७३० कोटी रुपये असे १०३७३०० कोटी रुपयांचा चूना लावला आहे. असा आरोप व्हिडिओकॉन ग्रुप एम्प्लॉईज युनियनने केला आहे. अशी माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत एड अभय टाकसाळ यांनी दिली आहे. उच्च न्यायालय, कामगार न्यायालयालाही धूत बंधू जुमानत नाही. औरंगाबाद , जालनाचे खासदार, आमदार यांची युनियन भेट घेणार आहे. त्यांना विनंती करणार आहे आमची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी भेट घालून द्या. व्हिडिओकॉन एम्प्लॉय यूनियनचे कामगारांचे थकीत वेतन धूत बंधूकडून काढून देण्याची मागणी करणार आहे. लवकर न्याय मिळाला नाही तर हा लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. कामगार उपायुक्त कार्यालयासमोर मागील १९९ दिवसापासून बेमुदत उपोषण सुरू आहे तरी त्यांना अजून न्याय मिळाला नाही. कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी समोर पर्याय नाही अशी माहिती युनियनचे अध्यक्ष जी.बी.खंदारे यांनी दिली आहे. यावेळी शेख कय्यूम, सुनील सिरसाठ व कामगार उपस्थित होते.
