सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*शिवसेनेचे आ.संतोष बांगर यांच्या वतीने रोजमजुरी करून स्वतःचे पोट भरणाऱ्या गरिबांना धान्य वाटप*



 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात लॉकडाऊन व संचारबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. या परिस्थितीत रोजमजुरी करून स्वतःची व कुटुंबाची खळगी भरणाऱ्या गोरगरीब कुटूंबियांना स्वतःची व कुटुंबाची भूक भागविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे अश्या परिस्थिती मध्ये सगळ्या समाज सेवकांनी,सर्व संघटनांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपणे गरजेचे आहे असे आवाहन संतोष बांगर यांनी केले आहे. याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोषराव बांगर साहेब यांच्यावतीने औंढा नागनाथ शहरासह कळमनुरी विधानसभा मतदारसंघात अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हे नेहमीच आपल्या कार्यशैली तून चर्चेत असतात अतिशय संवेदनशील सर्वसामान्यांच्या अडीअडचणी ची जाण असणारा नेता म्हणून आमदार संतोष बांगर यांना ओळखले जाते कुठलीही गोष्ट करत असताना ती फक्त प्रसिद्धीसाठी करत नसून माझ्या गोरगरीब बांधवांच्या चेहऱ्यावर ची काळजी कमी करण्यासाठी करतोय. तेव्हा मतदारसंघातील कुठल्याही बांधवांनी काळजी करण्याची काही गरज नाही हा तुमचा आमदार प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमच्यासोबत आहे अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. यावेळी औंढा नागनाथ नगरपंचायत चा नगराध्यक्षा विजयमाला राम मुळे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख G D मुळे पंचायत समिती मा सभापती अनिल भाई देशमुख हिंगोलीचे दबंग नगरसेवक रामभाऊ कदम शिवसेना तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख शिवसेना शहर प्रमुख अनिल देव माजी नगराध्यक्ष बंडू चोंडेकर माजी उपनगराध्यक्ष गणेश दादा कुरवाडे श्रीराम मराठी प्रमोद अग्रवाल निलेश सारडा राहुल दंत वार सुनील खंडागळे प्रदीप कनकुटे लल्ला देव शिवाजी बांगर मनोज देशमुख खंडू सोनटक्के दीपक सोनवणे वैभव विखे धुरपत गोरे साई गोरे माधव गोरे यांच्यासह सर्व शिवसैनिक उपस्थित होते
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com