सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*जागतिक महिला दिनी दंत व नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन ३५० महिलांची  तपासणी* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार वर्धा :- 



लॉयन्स क्लब हेरिटेज वर्धा आणि सोंदर्य संस्कार ब्युटी पार्लर चे संयुक्त विद्यमाने जागतीक महिला दिनी साईनगर चे श्री.गणेश व्यास मंदिरात दंत तज्ञ डॉ.आशिष जयस्वाल आणि नेत्रतज्ज्ञ डॉ.जयस्वाल यांच्जे मार्ग दर्शनात तपासणी शिबीर पार पडले उपस्थित डॉ. अर्पिता सिंघम (जयस्वाल ) डॉ.गायत्री सरवाल डॉ.दीक्षा वाघमारे यांनी जवळपास ३५० महिलांची रुग्णाची तपासणी करून विनामूल्य ओषधीचे वितरण व समयोचित मार्गदर्शन केले आर एस पी कंपनी तर्फे श्री.गजेन्द्र अतकरे यांनी ३०० सॅनेटरी नॅपकीन चे वितरण करून स्वचातेचा मंत्र दिला. लॉयन्स क्लब झोन चे चेअरमन श्रीमती शुभदा रुद्रकार यांनी महिला दिनाचे उद्घाटन केले याप्रसंगी सर्पांचा सौ प्रीती सवाई,अॅड. अर्चना पेठे,स्त्रीरोग तज्ञ डॉ. अर्पिता सिंघम (जयस्वाल )यांचेही समयोचित मार्गदर्शन झाले.संस्कृतीशी नाते घट्ट करणारी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली यामध्ये म.ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले,माँ.जिजाऊ झाशीची राणी लक्ष्मीबाई डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आकर्षक व्यक्तिमत्वाचे सादरीकरण करण्यात आले विजयी स्पर्धकांना डिझायनर साडी आणि नेकालेश सेट ह्या भेट वस्तू देण्यात आल्यात. या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल श्रीमती अरुणा येवले, सौ.पूनम मेघरे,श्रीमती माया निमजे,श्रीमती विअशाली वानखेडे,श्रीमती मीना सतवळकर आणि श्रीमती शिमा झाझुरकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच उपस्थिताना फुलझाडांची रोपे वितरीत करून गौरविण्यात आले .     कार्यक्रमाचे संचालन सौंदर्य संस्कारच्या सौ.नंदाताई बोदडे यांनी केले.सौ.अंकिता जगताप यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.    कार्यक्रमाचे यशस्वी पाने पर्र पाडण्यासाठी प्रोजेक्ट डायरेक्टर लाँ.सौ .सोनाली घोगरे,सौ.वर्षाताई दोड.सौ.अंकिता जगताप सौ.मायाताई निमजे तसेच सौ.मनीषा राजमलवार,अंजलीताईहूड,संध्याताई गोहो यांनी सहकार्य केले.              या कार्यक्रमात लॉयन्स क्लब हेरिटेजचे अध्यक्ष विस्वास भांबुरक,सहसचिव रितेश घोगरे,श्री.सिद्धार्थभाऊ सवाई, लॉयन्स वरिष्ठ संचालक डॉ.श्रीराम शर्मा,लॉं.भालचंद्र कठाळे, लॉ.मुस्तफा शौक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com