सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

सुपर फास्ट प्रतिनिधी : जिज्ञासु चाफले . कोरोना व्हायरसः जर्मनीच्या हेस्से राज्याच्या अर्थमंत्र्यांनी केली आत्महत्या .



 जर्मनीतल्या हेस्से राज्याचे अर्थमंत्री थॉमस शेफर यांचा मृतदेह फ्रँकफर्ट शहरातील रेल्वे रुळावर सापडला. जर्मनीची सार्वजनिक प्रसारण यंत्रणा DW नं ही बातमी दिली . थॉमस शेफर हे 54 वर्षांचे होते. शेफर यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुलं आहेत. थॉमस शेफर यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. कोरोना व्हायरसमुळं निर्माण झालेल्या आर्थिक समस्या हे कारण थॉमस शेफर यांच्या मृत्यूमागे असल्याचं तपास अधिकाऱ्यांना वाटत आहे. जर्मन माध्यमांच्या वृत्तांनुसार, थॉमस शेफर यांनी याच काही दिवसांपूर्वीच कोरोना व्हायरसची लागण झालेल्यासाठी आर्थिक मदतीची घोषणा केली होती. 'कोरोना व्हायरसमुळं शेफर तणावात होते' या घटनेनंतर हेस्से राज्याचे प्रमुख फोल्कर बूफिये यांनी व्हीडिओद्वारे संवाद साधला. ते म्हणाले, "कोरोना व्हायरसमुळं निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा सामना शेफर करत होते. या विषाणूच्या प्रसारानंतर थॉमस शेफर सातत्यानं लोकांना भेट होते, त्यांच्याशी बोलत होते." कोरोना व्हायरसमुळं शेफर हे गेल्या अनेक दिवसांपासून तणावात होते . बातमी आणि जाहिराती साठी संपर्क - 7770096996 - 7741864156
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com