सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

कोरोनो च्या भीती पोटी खाजगी दवाखाने बंद इगतपुरी तालुक्यातील घोटी शहर प्रसिद्ध बाजारपेठ आहे.घोटी शहराला १२७ गावं दळण- वळना साठी रोजच संबंध येतो. 


या गावांचा आरोग्याचा फार मोठा प्रश्न घोटी ग्रामीण रुग्णालय , खाजगी हॉस्पिटल व जनरल खाजगी डॉक्टर सोडवत असतात परंतु कोरोनो विषाणूचा येथिल डॉक्टर मंडळींनी धसका घेतल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.मागील आठवड्यात ८ते १० हॉस्पिटलमध्ये फक्त इमर्जन्सी रुग्ण सेवा चालू ठेऊन ओपीडी बंद केल्या.बाकीच्या डेकेअर डॉक्टरांनी अर्धवेळ चालू ठेऊन उद्या मात्र ९९ % दवाखाने बंद ठेवणार असल्याचे खात्रीलायक बातमी आमचे प्रतिनिधी ला मिळाली असून रुग्णा चे काय होणार याचा विचार न केलेलाच बरा याबाबत आरोग्य खाते काय भूमिका घेते हेच पाहावे लागेल . महाराष्ट्र फास्ट न्युज निवृत्ती मेदडे ९८२२५०२१५७

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com