सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ प्रतिनिधी‌ गंगापुर फिरोज मन्सुरी शेख...... 



 लासुरला गणपती मंदिराच्या 30
लाख रुपयांच्या सभा मंडपाचे भूमिपूजन.... लासुर स्टेशन येथिल गणपती मंदिराच्या जिल्हा परिषद तीर्थक्षेत्र विकास निधीतून तीस लाख रुपयांच्या सभामंडपाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अद्यक्ष देवयानी पाटील डोंणगावकर व पंचायत समितीचे उपसभापती संपतजी छाजेड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. लासुर स्टेशन येथील हे गणपती मंदिर अति प्राचीन असून काही वर्षांपूर्वी या मंदिराचा संस्थानच्या विश्वासतांच्या वतीने जीर्णाधार करण्यात आला होता तसेच या गणपती मंदिराला तिर्थक्षेत्राचा दर्जा जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी देवस्थानचे अद्यक्ष कैलास जाजू ,ऍड.देवयानी डोणगावकर,उपसभापती संपत छाजेड,माजी सभापती संजय जैस्वाल, सरपंच रश्मीताई जैस्वाल,उपसरपंच गणेश व्यवहारे,बाजार समितीचे संचालक संदीप आढाव, माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य सुरेश जाधव,शिवसेना नेते संतोष पाटील जाधव,भाऊसाहेब मामा गाडेकर,ग्रामपंचयत सदस्य सर्वश्री.नारायण ठोळे,जयदेव अण्णा जाधव,शिवसेना शहरप्रमुख नितीन पाटील कांजूने,शिवसेना उपशहरप्रमुख नितीन पाटील जाधव,माजी शहरप्रमुख सुभाष पाटील नरोडे,माजी जिल्हा परिषद सद्यस्य प्रकाश परोडकर,सिरेगावचे माजी सरपंच नितीन पाटील कऱ्हाळे,योगेश पाटील मापारी,संजय पाटील कापसे,डॉक्टर नंदकिशोर उदावंत,शिवसेना महिला आघाडीच्या सोमासे ताई,देवके ताई,आदींसह अनेक गावकरी व भाविक भक्तांची उपस्थिती होती.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com