पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ निर्माण व्हावी - डॉ. विकास बेले *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट9923937033*
स्थानिक वडनेर येथील श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय महाविद्यालयात पर्यावरण समितीच्या व पर्यावरण सर्व धनाची चळवळ निर्माण करणे मानवी गरज या विषयावर या अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उत्तम पारेकर हे होते प्रमुख मार्गदर्शक डॉ. विकास बेले,आर. एस. बिडकर महाविद्यालय हिंगणघाट होते, तर विशेष अतिथी म्हणून विनोद मुडे, विशेष अतिथी म्हणून डाॅ. गणेश बहादे होते, मानवी कृतीमुळे पर्यावरणाची घटलेली गुणवत्ता वाढविणे व पर्यावरणाची स्थिती सुधारणे या धेयपुर्तीसाठी पर्यावरणाच्या संवर्धनाची लोक चळवळ निर्माण व्हावी असे प्रतिपादन डॉ. विकास बेले यांनी केले. पर्यावरण संवर्धनासाठी पर्यावरण तज्ञ अभ्यासक प्रशासन सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते सर्वस्तरातून पर्यावरणाचे अब शाशक प्रशासन सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते अशा सर्व स्तरातून पर्यावरणाचे सर्वधन या विषयावर विचार विनियम करीत आहे तरी पण दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसत आहे तेव्हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पर्यावरण विषयक जाणीव जागृती करण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. उत्तमराव पारेकर यांनी विद्यार्थ्यांना अध्यक्षीय भाषण करीत असताना केले त्याच प्रमाणे धर्म, संस्कृती, प्रथा -परंपरा, सण-उत्सव याप्रसंगी होणारी पर्यावरणाची हानी थांबविणे काळाची गरज आहे. असेही ते पुढे म्हणाले. या व्याख्यानाच्या प्रसंगी प्रास्ताविकेतून विषयाचे महत्व प्रा. पंकज मून यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. विनोद मुडे यांनी मानले यापैकी महाविद्यालयातील प्रा डॉ प्रवीण कारंजकर प्रा डॉ नरेश भोयर, विठ्ठल घिनमीने, नितेश तेलहांडे, आरती देशमुख व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*
