सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी संपुर्ण भारत लाॅकडाऊन अाहे.या लाॅकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे आतोनात हाल होत आहेत.दिवसभर कुठे काम केले तर संध्याकाळची चुल पेठते.लाॅकडाऊनमुळे कामही बंद आहेत.



शासनाचे आदेश आहेत घराच्या बाहेर पडायचे नाही.घराच्या बाहेर पडलं नाहीतर या गरीब कुटूंबावर उपासमारीचे वेळ येते.यामुळे सामाजिक भान असणाऱ्या तलाठ्याचे मदतीसाठी हात सरसावले आडगाव पिशोर सजेचे तलाठी नारायण पठ्ठे यांनी दिगाव ,खेडी कुटंब १६ व आडगाव पिशोर कुटूंब ०३ असे एकूण १९ कुटुंबाणा असणाऱ्या गरीब बांधावांना प्रत्येकाच्या घरात स्वतःच्या पगारातील पैसाने तांदूळ,गहू,साखर,डाळी,तेल पुडे,शेंगदाणे,पोहे,बेसन पीठ,बिस्कीटे असे महिनाभराचे धान्य वाटप करण्यात आले.यावेळी मंडळ अधिकारी विलास जोशी ,रवींद्र पिंपळे सरपंच रंगराव सुसुंदरे ,उपसरपंच राजू तुपे ,त्रंबक सुसुंद्रे आरमान मदार, अनिल भोसले, आसाराम भोसले, राजेंद्र भोसले, बाळा भोसलेसह आदी उपस्थित होते प्रतिनिधी विजय वैष्णव 9423866969
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com