सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

आरोग्य विभागाचा उपक्रम *कोरोना विषाणू बाबत रत्नापूर येथे जनजागरण सभा* *कोरोना विषाणू आळा घालण्यासाठी सहकार्य करा* - दिलीप उटाणे वर्धा जिल्हा प्रतिनिधी:पवन चंबुलवार :- 



प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ उपकेंद्र हुसनापूर च्यावतिने ११ मार्च (बुधवार) रोजी आरोग्य सहाय्यीका सविता फरताडे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य सेवक दिलीप उटाणे कृष्ठरोग तंत्रज्ञ बबीता ताकसाडे जि.पशाळेचे मुख्याध्यापक श्रीराम शहारे सुनिता नगराळे लता कौरती निता नेहारे आरोग्य सेविका वृंदा घोडमारे माधव कातकडे मनिषा सोनवाने रंजना तोंडासे वंदना मडावी आशास्वंयसेविका शारदा वाघ यांच्या उपस्थिती मध्ये कोरोना जनजागण सभा घेण्यात आली. आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी *कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे खोकला ताप श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होणे* इत्यादी आहेत. *साबन पाण्याने आपले हात स्वच्छ धुवा* *सर्दी किंवा फ्लू असल्यास लोकांच्या जवळ जावू नका* *सिंकताना खोखलताना आपल्या नाकावर तोंडावर रुमाल ठेवा* जर या रोगाची लक्षणे आढळून आले तर त्वरीत शासकीय रुग्णालयात संपर्क करा. *आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सुचनाचे पालन करा इतरांना सांगा* *कोरोना विषाणू आळा घालण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी केले* घाबरुन जावू नका आपल्या सुरक्षित ठेवण्यासाठी सांगितलेले उपाय करा. इत्यादी सविस्तर मार्गदर्शन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाव्दारे गावा गावात विविध कार्यक्रम घेवून जनजागरण करण्यात येत आहे सभेला रत्नापूर येथील महिला मोठ्या संख्येनी उपस्थित होते प्रास्ताविक आरोग्य सेवक माधव कातकडे यांनी केले . संचालन वृंदा घोडमारे यांनी तर आभार शारदा वाघ यांनी केले
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com