सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

खुशखबर ! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :- 



नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. भारतीय रुपया मजबूत झाल्याने आज सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचे पाहायला मिळाले. आज बुधवारी दिल्लीत सोन्याच्या किंमतीत 516 रुपयांनी घट झाली. तर आज चांदीच्या दरात तेजी आली, आज चांदी 146 रुपयांनी महागली. सोन्याचे दर – बुधवारी सोन्याच्या दरात घसरण झाली. आज सोनं 516 रुपयांनी स्वस्त झालं. त्यामुळे आज सोनं 45,033 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. चांदीचे दर – बुधवारी चांदीच्या दरात तेजी आली. बुधवारी दिल्लीत चांदी 146 रुपयांनी महागली. आज चांदी 47,234 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजचे सीनिअर अ‍ॅनिलिस्ट तपन पटेल म्हणाले, दिल्लीत 24 कॅरेट सोनं हाजिर भावात 516 रुपयांनी स्वस्त झाले. सोन्याच्या दरात या कारणाने होत आहे घसरण – पटेल म्हणाले, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 36 पैशांनी मजबूत झाला. जागतिक स्तरावर देखील सोनं स्वस्त झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं 1,661 डॉलर प्रति 28.34 डॉलर झाले तर चांदी 17.03 प्रति 28.34 ग्रॅम झाली.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com