परिस्पर्श फाऊंडेशनच्या वतीने गोरगरीब नागरिकांना धान्य वाटप,
फुलंब्री प्रतिनिधी/ दि.31
फुलंब्री येथील सैलानी बाबा दर्गा नजीक अनेक कुटुंब झोपड्या करून राहत आहे सदरील नागरिक आपल्या आपापल्या परीने गाव गाव सोडून आपला छोटा मोटा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होते . व आपल्या कुटुंबाची गुजराण करत असताना कोरोना च्या अनुषंगाने येथील नागरिकांना सर्वच समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने आणि यातच सर्वच व्यावसाय बंद झाल्याने यांच्या जेवणचा प्रश्न निर्माण झाला होता येथील कैकाडी समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष वाल्मिक जाधव आणि परिसस्पर्श फाउंडेशनचे अध्यक्ष भास्कर मोरे यांच्या वतीने येथील नागरिकांना गहू आणि तांदळाचे वाटप करण्यात येऊन त्याचा काही दिवसाचा जेवनाची व्यवस्था करण्यात आली आहे
या वेळी वाल्मीक जाधव ,भास्कर मोरे,संजय मोरे,योगेश पेटारे, सागर भारद्वाज.आकाश गंगावणे.बाळू गंगावणे.विजय पगडे,आनंद तुपे.भरत जाधव.शंकर कल्याम.संतोष पवार.सचिन तुपे यांच्या सह आदींची उपस्थिती होती .