सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*खा. बाळू धानोरकर यांनी जाणल्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील समस्या* चंद्रपूर - 



बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मूल,पोभुर्णा व बल्लारपूर या तालुक्यात आज खासदार बाळू धानोरकर यां

नी दौरा करित विविध समस्या जाणून घेतल्या.यावेळी त्यांनी अनेक विकासकामे त्वरीत मार्गी लावणार असल्याचे सांगितले.आपल्या लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक विभागाचा समांतर विकास आपले ध्येय असल्याचे यावेळी ते म्हणाले. यावेळी मुल येथे माजी आमदार देवराव भांडेकर, ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, काँग्रेस नेते डॉ. विश्वास झाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अहिरकर, संजय मारकवार, रितेश तिवारी, घनश्याम येनुरकर तसेच तहसीलदार जाधव, पोलीस निरीक्षक राजपूत, रूपाली रत्नाकर, नगरसेविका फूलझले, यांची उपस्थिती होती. येथील नागरिकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांचे खासदारांनी निराकरण केले. येथील रुग्णांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यासाठी खासदार निधीतून रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यासोबतच ग्रामीण तसेच शहरात बांधण्यात येणाऱ्या शौचालयाच्या निधी समान करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोंभुर्णा येथे तालुकाध्यक्ष कुंदावार, माजी तालुका अध्यक्ष ओमेस्वर पदमगिरवार, आतिष कुरेशी, अशोक गेडाम, देवाडा सरपंच विलास मोगरकर, तहसीलदार तसेच ठाणेदार यांची उपस्थिती होती. येथील ग्रामस्थांनी खासदार महोदया समोर आपल्या समस्या म्हणल्या. त्यामध्ये पांदण रस्ते, एमआयडीसी, गावातील प्रश्नांचा समावेश होता. त्यामध्ये तहसीलदारांना निर्देश देऊन तिथेच अनेक प्रश्नांच्या निपटारा करण्यात आला. त्यानंतर बल्लारपूर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रजनीताई हजारे, ज्येष्ठ नेते घनश्याम मुलचंदानी, फारुख भाई, तहसीलदार, ठाणेदार, बीडिओ, करीम भाई, विनोद माकोडे यांची उपस्थिती होती. या तालुक्यातील समस्या ग्रामस्थांनी मांडल्या. त्यामध्ये विसापूर येथे स्थायि डॉक्टर, येथील युवकांना रोजगार, पांदण रस्ते या समस्या चा समावेश होता. सर्व समस्या तातडीने निकाली काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना खासदार महोदयांनी निर्देश दिले. पांदण रस्ते व इतर कामाकरिता खासदार नीधी तसेच विविध योजनेतून ठिकाणे तात्काळ करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येणार याची ग्वाही खासदार महोदयांनी नागरिकांना दिली. यावेळी उपस्थित नागरिकांच्या चेहरावर समाधान दिसून आले.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com