*वरुण देशपांडे यांचा सातासमुद्रपार झेंडा* *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*
हिंगणघाट : अमेरिकेतील बोस्टन येथील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या हार्वर्ड युनिवर्सिटी येथे आयोजित " एचपेअर" हार्वर्ड परिषदेत हिंगणघाटचा वरुण विनोद देशपांडे यांनी एशियन आणि आंतरराष्ट्रीय संबंध याविषयावर प्रोजेक्टचे सादरीकरण करून प्रथम स्थान प्राप्त केले आहे. " एचपेअर"ही हार्वर्ड कॉलेज मधील आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त विद्यार्थी संघटना आहे,परिषदेत आशिया पॅसिफिक क्षेत्राशी संबंधित सर्वात महत्त्वाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक प्रश्नांची चर्चाकरून देवाणघेवाण करण्याचा एक प्रकार आहे.या परिषदेला आजवर दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि शांततेसाठी नोबेल पुरस्कार विजेते किम दाई जंग,ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर जनरल पीटर होलिंगवर्थ, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून, सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष एस.आर नथान, जपानमधील युनायटेड स्टेटचे माजी राजदूत जॉन थॉमस यांच्यासह अनेक दिग्गजांनी मुख्यवक्ता म्हणून हजेरी लावली आहे. वरुण हा येथील वीज महावितरणचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता विनोद देशपांडे यांचा मुलगा आहे.त्याचे शालेय शिक्षण हिंगणघाट येथे झालेले असून त्यांने बीटेक ची पदवी भोपाळ येथून प्राप्त केली,त्याने पॅरीस युनिवर्सिटीतून पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले, आता तो पीएचडी ही फ्रांस येथे घेत आहे, हे शिक्षण त्याने फ्रांस शासनाची शिष्यवृत्ती मिळवीत केले आहे. त्याच्यातील कौशल्य व गुणवत्तेच्या जोरावर फ्रांस येथून एचपेअर हार्वर्ड कॉन्फरन्सकरिता निवड करण्यात आलेल्या तिघात वरुणचा समावेश करण्यात आला.ही अत्यंत गौरवाची बाब आहे.वरुण यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवडील सौ.वर्षा आणि विनोद देशपांडे आणि मार्गदर्शकांना दिले आहे.त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*
