सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

* *श्री साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालयात जागतिक दिन साजरा** *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 

9923937033* 


* *श्री साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालयात जागतिक दिन साजरा** *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033* श्री साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालय वडनेर येथे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदामध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर उत्तमराव पारेकर उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून एडवोकेट प्रतिभाताई भानखेडे, हिंगणघाट, सरपंच सौ. कविताताई वानखेडे, डॉक्टर नमिता बेलेकर, डॉक्टर तेजस्विनी पाणबुडे, उपस्थित होत्या. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर सारिका चौधरी, सौ वैशाली ताई वानखेडे, वर्षाताई दांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लोकमता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीप प्रज्वलन करून झाले. जागतिक महिला दिनानिमित्त यावेळी महिला सुरक्षा व महिला संरक्षक कायदे या विषयावर भाषण स्पर्धा ठेवण्यात आली होती. यामध्ये मयूर भोयर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर द्वितीय क्रमांक आकाश चौधरी यांनी पटकाविला. तसेच महिला दिनावर आधारित नाटिका सादर करण्यात आली यामध्ये विभाग गुरनुले हिने सावित्रीबाईची भूमिका निभावली. तसेच राजकुमार कोरेवार, प्रीतम डफ, देवानंद कुलसंगे, शिवानी आठवले यांनी नाटिकेत सहभाग घेतला. यावेळी महिला दिनानिमित्त वेशभूषा स्पर्धा ठेवण्यात आली होती. वेशभूषा स्पर्धेमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांची पेहराव व स्त्रियांची वेगवेगळी रूपे प्रदर्शित करण्याचा प्रयत्न विद्यार्थिनींनी केला होता. वेशभूषा स्पर्धेमध्ये प्राची चाफले हिने प्रथम क्रमांक तर अश्विनी उगेमुगे हिने द्वितीय क्रमांक, उज्वला निकुरे हिने तृतीय क्रमांक पटकाविला. कार्यक्रमात एडवोकेट भानखेड यांनी स्त्री सुरक्षा विषयक कायदे व महिला संरक्षण या विषयावर विस्तृत भाषण केले तर सरपंच कविता वानखेडे यांनी आपले विचार व्यक्त करताना श्री आदिशक्तीचे रूप आहे. तिच्या मध्ये अफाट शक्ती आहे, उर्जा आहे, क्षमता आहे, आणि राहणारच, त्यात वाढच होत आहे. परमेश्वराने स्त्रीला सोशिक तेचे, सहनशीलतेची सुंदर वरदान दिले. त्यामुळे आयुष्यात कितीही कसोटीचे, दुःखाचे प्रसंग आले, तरी चटकन सावरणारी, खंबीरपणे उभी राहणारी स्त्रीच असते, असे मत मांडले डॉक्टर नमिता बेलेकर यांनी स्त्री आरोग्य या विषयावर विद्यार्थिनींना विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन कामाचे ठिकाणी स्त्रियांची लैंगिक छळ संरक्षण प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 अंतर्गत महाविद्यालयीन समितीच्या समन्वयक प्रा. आरती देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रवीण करंजकर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे संचालन विभाग गुरनुले, हिने तर आभार प्रा. आरती देशमुख यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक विनोद मुंडे, डॉ. नरेश भोयर, डॉ. गणेश बहाडे, डाँ. विठ्ठल घिनमीने, प्रा. पंकज मून, प्रा. नितेश तेलहांडे, प्रा. संजय दिवेकर. कु. प्रीती सायंकार, कु. विजयालक्ष्मी जारोंडे, अरुण तिमांडे, अंकुश वैदय, नरेश कातडे. सचिन महाजन, व विद्यार्थिनींनी सहकार्य केले. *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट 9923937033*


सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com