सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज़ गंगापूर
(प्रतिनिधी) शेख फिरोज मन्सुरी
गंगापुर तालुक्यातील शंकरपूर येथील पंचवीस वर्षीय युवकांवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करुन आरोपी फरार या हल्ल्यामागील कारण अद्यापही समजु शकले नाही गंगापूर तालुक्यातील शंकरपूर येथील रवींद्र विजय गायकवाड (वय 25) व अपील उबाळे हे दोघे त्याच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले असताना पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान अज्ञात दोन व्यक्तीने गायकवाड यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने जबर वार करून पोबारा केला यावेळी रवी यांच्या शेजारी कपिल उबाळे हा आवाजाने जागा झाला असता रविंद्र गायकवाड हा गंभिर जखमी दिसल्याने त्याने हि माहिती रवीच्या वडिलांना दिली व त्यास ताबडतोब औरंगाबाद येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्वानपथकास पाचारण करण्यात आले असता स्वीटी या स्वानाने घटनास्थळापासून भरपूर माग काढला परंतु काहीही निष्पन्न झाले नाही उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित,शिल्लेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शौकत अली सय्यद,स्वान पथकाचे जी.जे व्यवहारे,राठोड,यांनी भेट देऊन चौकशी केली असून पंचनामा करण्यात आला आहे. यावेळी बिट अंमलदार बि आर उदे,पोलीस कॉन्स्टेबल मनोज नवले,काळे , आदींनी घटनास्थळाची पहाणी केली या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण पसरले असुन हा घात की अपघात हे अद्याप सिद्ध झाले नाही या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या विरोधात शिल्लेगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे
