*!! छत्रपती शिवाजी महाराज की जय !!* *"वीर भगतसिंह संस्था सेलू" च्या माध्यमातून *छत्रपती शिवाजी महाराज जयंती" निमित्त यावर्षी सुद्धा गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन केले शिवरायांना वंदन* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-
राजे शिवछत्रपती महाराज यांची आज जयंती शिवछत्रपती यांची ओळख म्हणजे प्रजाहीतदक्षकारी,न्यायप्रेमी, लोककल्याणारी,जाणता राजा अशी आहे रयतेच्या हितासाठी गोरगरिबांच्या रक्षणासाठी स्वराज्याचा विडा उचलून तो निर्मितीसाठी उभे आयुष्य वाहून देणारे असे शिवरायांचे जीवन चरित्र जे प्रत्येकास प्रेरणादायी व स्पूर्तिदायक आहे अश्या या आपल्या लाडक्या राजाच्या जयंती निमित्त *वीर भगतसिंह संस्थेच्या सदस्यांनी* शिवरायांचे मावळे म्हणून एक वेगळी आदरांजली द्यायचे ठरविले व त्या अनुषंगाने मागच्या वर्षी पासून काही गरजू व गरीब मुलांच्या वार्षिक शिक्षणाचा भार *"पढेगा इंडिया तभी तो आगे बढेगा इंडिया"* या उपक्रामाअंतर्गत संस्थे द्वारा उचलायचे ठरविले कारण शिवरायांच्या या स्वराज्यातील युवक शिक्षित असेल तरच तो समाजास योग्य दिशा देऊ शकतो समाजातील प्रश्न ,समस्या समजू शकतो या काळात तलवार ढाल घेऊन लढायची तर गरज नाही उरली परंतु लेखणी ही सुद्धा कुठल्या तलवारी पेक्षा कमी नाही आणि तिला समजाच्या रक्षणासाठी वापरायचे असल्यास समाजातील युवा पिढी ही शिक्षित असणे अत्यावश्यक आहे म्हणून *दिनांक १९ फेब्रुवारी २०२० ला शिवजयंतीच्या* पावन पर्वावर *वीर भगतसिंह संस्था* सेलू च्या वतीने काही गरजू मुलांना वार्षिक शिक्षणाची मदत करण्यात आली व त्याबद्दलचे पत्रक त्यांस VBS Unity Gym येथे देऊन शिवरायांना मानवंदना वाहण्यात आली यावेळी वीर भगतसिंह संस्था सेलू च्या सदस्यां सोबत शिवगर्जना मित्र मंडळ सेलू चे सदस्यगण उपस्थित होते,आतापर्यंत या उपक्रम अंतर्गत २५ गरजू विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने वार्षिक शैक्षणिक मदत देण्यात आली आहे.
