सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*वंचित बहुजन आघाडीच्या वतीने* वर्धा जिल्हा प्रतिनिधी:पवन चंबुलवार :-


 राष्ट्रवादी कांग्रेस चे माजी आमदार राजू तिमांडे व काग्रेस चे शहर अध्यक्ष पढरीभाऊ कापसे यांच्या घरावर विनंती मोर्चा,,, हिंगणघाट ---- देशात असंविधानिक CAA, NRC, NPR, कायदयाच्या विरोधात महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्व मताने ठराव मंजूर करून या NPR, NRC, रद्द करावा अशी विनंती मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. देशातील गैर भाजपा राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून या कायद्याच्या विरोधात ठराव पारित केला आहे. आज राज्यात महाआघाडीचे सरकार आहे या आघाडीत प्रमुख पक्ष कांग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष सत्तेत आहे. या दोन्ही पक्षाचा काळ्या कायद्याला विरोध आहे तर त्यांनी विशेष विधानसभा अधिवेशन बोलावून NPR, NRC,रद्द केली पाहिजे येत्या एक मे पासून या कायद्याची अंमलबजावणी होत आहे ही अंमलबजावणी लवकरात लवकर थांबविण्यात यावी, जर हा कायदा थांबला नाही तर राज्यातील 40%SC ST OBC सहित मुस्लिम अल्पसंख्यांक घोक्यात येतील, आज देश आर्थिक संकटात सापडला आहे बेरोजगारी शिक्षा भष्ट्राचार दलित ओबीसी ST समाजावर होणारे अत्याचारा पासून जनतेची दिशाभूल करण्यासाठी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारने NPR, NRC विरोधी ठराव विधानसभेत मांडून बहुमताने पारित करून घ्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या विनंती करित असून या मोर्चात वंचित बहूजन आघाङी हिंगणघाट तालुका अध्यक्ष डॉ उमेश वावरे ,शहर अध्यक्ष दिलिपभाऊ कहूरके, मनीष कांबळे, चारू आटे, सचिन खोब्रागडे, राजेश खानकूरे, प्रशांत शंभरकर, राकेश बोबडे, मंगेश पाटील, प्रणय पाटील, विजय फूलझले, आशीष पिलारे प्रफुल ऊईके, देवेन्द्र भालशंकर, निखिल रामटेके,,प्रदिप डोळस,शूभम ढप,वैभव दूरबूडे,शूभम शिरभैरे,मयूर ठाकरे, शिवा मजरे,आकाश वाघमारे, मनोज कोल्हे, गोलू बाकडे, अक्षय वानखेडे अभिजित निळे, कुणाल कोल्हे, प्रदिप मानिकपूरे, सर्व पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थिति होते
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com