*भीम आर्मी भारत एकता मिशन महाराष्ट्र प्रदेश* 🇮🇳🇪🇺🇮🇳🇪🇺🇮🇳🇪🇺🇮🇳 *प्रसिध्दीसाठी*
*राज्यातील आघाडी सरकार केंद्राच्या ईशा-यांवर चालते काय- भीम आर्मीचा सवाल* *CAA , व मागासवर्गीयांच्या आरक्षण प्रश्नावर 23 फेब्रुवारी रोजी भारत बंद* मुंबई-२०-- लोकशाही मार्गाने महाराष्ट्रात सभा घेऊन सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाट मोकळी करून देणा-या भीम आर्मी प्रमुख भाई अॅड चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्या महाराष्ट्रातील सभांना परवानगी नाकारणारे महाविकास आघाडीचे सरकार केंद्राच्या व आर एस एसच्या ईशा-यावर चालते काय? असा सवाल करतानाच महाराष्ट्र दौ-यादरम्यान अॅड आझाद यांच्या केसालाही धक्का लागला तर याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल असा ईशारा भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेचे केंद्रीय कार्यकारीणी सदस्य व माजी महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला .सीएए एन आर सी व एनपीआर तसेच मागासवर्गीयांच्या आरक्षण प्रश्नांवर येत्या 23 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या देशव्यापी भारत बंद मध्ये कामगार, कर्मचारी व अधिकारी,व्यापारी व जनतेने शांततापूर्ण मार्गाने सहभागी व्हावे असे आवाहन कांबळे यांनी केले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कांबळे म्हणाले कि ,CAA,NRC,NPR,संदर्भात तसेच मागासवर्गीयांच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा आलेला निर्णय, महीला अत्याचार , दादर रेल्वे स्टेशनला डाॅ बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नाव देणे, भीमा कोरेगाव एल्गार परिषदेसंदर्भात सरकारमध्येच उडालेला गोंधळ आदी संदर्भात भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर 21 फेब्रुवारी रोजी व नागपूर रेशीमबाग मैदानावर 22 फेब्रुवारी रोजी भीम आर्मी प्रमुख भाई अॅड चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्या होत असलेल्या जाहीर सभांना पोलीसांनी परवानगी नाकारली.देशात सर्वत्र चंद्रशेखर आझाद यांच्या सभा लोकशाही मार्गाने होत असल्या तरी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करीत महाराष्ट्रात मुंबई व नागपूर पोलीस मात्र या सभांना परवानगी नाकारतात हे निषेधार्ह असून यात राज्य सरकार आजही केंद्र सरकार व आरएसएसच्या इशाऱ्यावर देशातील दलित ओबीसी बहुजनांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका कांबळे यांनी केली आहे याच विषयासंदर्भात भाई अॅड चंद्रशेखर आझाद यांनी 23 फेब्रुवारी रोजी देशव्यापी भारत बंदची हाक दिली असून महाराष्ट्रातील दलित, एस सी एसटी ओबीसी, बहुजन समाजासह मुस्लिम ,सरकारी कर्मचारी अधिकारी संघटना , संस्था , यांनी लोकशाही मार्गाने व शांततेत या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कांबळे यांनी केले. मुंबईत तसेच नागपूर येथे भीम आर्मीने आयोजित केलेल्या सभांमध्ये राज्यातील बहुजन समाजासह मुस्लिमसंघटना मोट्या प्राणावर सामील झाल्या आहेत नागपूर उच्च न्यायालयात पोलिसांच्या विरोधात आम्ही न्यायालयात गेलो असून आज परवानगी मिळाल्यानंतर आझाद हे नागपूर नंतर औरंगाबाद येथे २३ फेब्रुवारी रोजी महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यकर्त्यांना भेटणार आहेत यानंतर त्यांचा दौरा कर्नाटकातील विजापूर येथे असून या दरम्यान महाराष्ट्रात भाई चंद्रशेखर आझाद यांना चोख पोलीस बंदोबस्त पुरविण्यात यावा अशी मागणी कांबळे यांनी केली . या पत्रकार परिषदेला कांबळे यांच्यासह , महाराष्ट्र महासचिव सुनीलभाऊ गायकवाड, मुंबई कार्यवाहक अध्यक्ष दिपकभाऊ हनुवंते व पदाधिकारी उपस्थित होते .
!doctype>
