सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्था जिल्हा पुरस्काराने सन्मानित .* राहुल दूरतकर ,



 तालुका प्रतिनिधी हिंगणघाट वर्धा स्थानीय वर्धा येथे युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय , भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र वर्धा व्दारा आयोजित जिल्हा स्तरीय युवा सम्मेलन सामाजिक न्याय विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला . याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्धा समाजकल्याण उपायुक्त मा. सुरेंद्रजी पवार ,मार्गदर्शक जिल्हा नियोजन अधिकारी मा .श्री .अरविंदजी टेंभुर्णे , उद्घघाटक समाजकल्याण साहाय्यक आयुक्त मा .श्री अनिलजी वाळके, प्रमुख उपस्थिती मा .श्री .डॉ . वैद्य सर , आयोजक म्हणून नेहरू युवा केंद्र वर्धाचे जिल्हा युवा समन्वयक मा .श्री . शिवधन शर्मा , लेखापाल दयारामजी रामटेके यांचा प्रमुख उपस्थिती पार पडला .याप्रसंगी सन 2010 पासून हिंगणघाट तालुक्यातील वड्णेर परिसरात ग्रामिण भागातील युवकांन करिता , महिला करिता व विद्यार्थ्यांन करिता जिल्ह्यात उत्क्रुष्ट सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी कार्यरत असलेली युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्था या संस्थेस युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय , भारत सरकार च्या नेहरू युवा केंद्र वर्धा कार्यालय व्दारा मा .जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सन 2018 -2019 चा जिल्हास्तरीय उत्क्रुष्ट युवा मंडळ पुरस्कारानी युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्थेला सन्मानित करण्यात आले . यावेळी वर्धा समाजकल्याण उपायुक्त मा. सुरेंद्रजी पवार व मार्गदर्शक वर्धा जिल्हा नियोजन अधिकारी मा .श्री .अरविंदजी टेंभुर्णे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय उत्क्रुष्ट युवा मंडळ पुरस्कार प्रमाणपत्र , स्म्रुती चिन्ह आणि रोख 25000 रुपयाचा धनादेश स्वीकारतानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दूरतकर , कार्यक्रम अधिकारी विकास तिजारे ,सदस्य रंजीत वांढरे, सचिन महाजन , शिक्षिका विभा गुरुनुले , संस्थेच्या महिला संरक्षण प्रतिनिधी कु . मनिषा वांढरे , कु . प्रीती पंढरे , वैष्णवी तिजारे , तेजस्वी सातपुते , जयश्री वांढरे , शिवानी तिजारे , सौ .रोशनी शिरपूरकर यांची उपस्थिती होती .ही संस्था गेली 10 वर्षा पासून वड्णेर परिसरात सामाजिक आणि शैक्षणिक कार्या सोबत च ग्रामिण शेतकरी आणि शेतमजूर यांच्या पाल्या करिता 50 टक्के सवलतीच्या दरात संगणक आणि कौशल्य प्रशिक्षण देण्याचे उत्क्रुष्ट कार्य करीत असून शासनाने या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन जिल्हास्तरीय उत्क्रुष्ट युवा मंडळ पुरस्कारानी सन्मानित केल्याबद्दल संस्थेचे हिंगणघाट परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहेत . यावेळी जिल्हा परिषद सभापती श्री . माधवराव चंदनखेडे , साईबाबा कला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री . डॉ . ऊत्तम परेकर , प्राध्यापिका सौ . डॉ . सारिका चौधरी , प्रा .डॉ .प्रविण कारंजकर , प्रा .विनोद मुडे , प्रा .डॉ .गणेश बाहादे , डॉ .वित्ठल घिनमिने , डॉ . नरेश भोयर , प्रा .पंकज मून , प्रा .संजय दिवेकर , प्रा .नितेश तेलरांदे , झेप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप सुपटकर , नेहरू युवा केंद्रचे मंगेश दूभे , युवा सेना तालुका अधिकारी निखिलभाऊ वाघ , पत्रकार जगदीश घूगरे , सतीश काळे , सागर बोंद्रे , संस्थेचे उपाध्यक्ष किरणकुमार गहुकर , सचिव सौ .सुषमा गहूकर , सहसचिव सौ .सुनिता व्रुणेष गहूकर , कोषाध्यक्ष श्री . निलेश गहूकर , सदस्य राहुल गिरी , नितेश दूरतकर , सौ .सुनिता निलेश गहूकर , सौ .करुणा लांडे , कु .श्रुती जयस्वाल , शिक्षका सौ .कल्याणी उरकूडे , पवन झोटिंग , आशिष ढगे , राहुल ठाकरे , गणेश शेळके , मंगल काळे मार्गदर्शक श्री .शंकर राव गारघाटे आदीनी संस्थेचे व संस्थेच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन व्यक्त केले . *राहुल दूरतकर , तालुका प्रतिनिधी हिंगणघाट वर्धा 9923937033*
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com