*शेतकऱ्यांनी शेतीसोबत पूरक व्यवसाय करावा :- आमदार प्रतिभाताई धानोरकर* चंद्रपूर :-
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे दिवसेंदिवस कठीण झाले आहे. शेतीमध्ये लावलेल्या खर्च देखील शेतकऱ्यांच्या हाती येत नसल्याचे दिसून येत आहे. आपला परिसर दुग्ध व्यवसायासाठी अनुकूल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त शेतीवर अवलंबून न राहता जोडधंदा म्हणून शेतकऱ्याने दुग्ध व्यवसाय करावे असे आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. पंचायत समिती वरोरा तर्फे आयोजित तालुकास्तरीय पशुप्रदर्शन च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे, उपाध्यक्ष रेखाताई कारेकर, जिल्हा परिषद सदस्य सुनंदा जीवतोडे, ज्योती वाकडे, डॉक्टर आसावरी देवतळे, विद्या किनाके, विजय आत्राम, शालिकराम झाडे, विकास डांगरे, खुशाल सोमलकर, पर्वता डोक, रोशनी देवतळे, पपीता गुळघाने, वंदना दाते, नरेंद्र अडकिने, शेषराव जीवतोडे यांची उपस्थिती होती. त्यापुढे बोलताना म्हणाला की, शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विहिरी, कृषी पंप यासह विविध योजना राबविल्या जातात या योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपले जीवन मान उंचवावे असे आवाहनही त्यांनी केले.
