*छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करताना नवाब मलिक गप्प; सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये सर्व छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना नवाब मलिक शांत उभे असल्याचं दिसत आहे. *या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित आहेत. यामध्ये धनंजय मुंडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना यात नवाब मलिक मात्र गप्प बसल्याचं दिसत आहे.* *अजित पवारांसह अन्य सर्व जण शिवरायांच्या नावाने जय म्हणताना दिसत आहेत. मात्र नवाब मलिक गप्प उभे आहेत. त्यांचा हा व्हीडिओ शिवप्रेमींनी सोशल मीडियावर पोस्ट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.* दरम्यान, नवाब मलिक यांच्या या व्हीडिओवरून मनेसे नेते अमेय खोपकर यांनी देखील नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.