*श्री बाकलीवाल विद्यालय वाशिम तर्फे पथनाट्य द्वारे दिला व्यसन मुक्ती चा संदेश* *जिल्हा प्रतिनिधी :- चेतन कै.बांगर*
वाशिम शहरात बाकलीवाल विद्यालयात जागतिक कर्करोग दिना. निमित्त दि 4 फेब्रुवारी रोजी विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून वाशिम शहरात विद्यालयाचे एन.सी.सी.चे विद्यार्थ्यांनी पथनाट्य द्वारे घुटका तंबाखू,बिडी, सिगारेट इ प्रकार चे व्यसन करू नये असा संदेश दिला तसेच विविध स्पर्धेचे आयोजन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाळेचे सेवा निवृत्ती मुख्याध्यापक श्री काळे सर,प्रमुख पाहुणे जिल्हा स्काऊट गाईड चे आयुक्त श्री राजेश गावंडे साहेब, विद्यालयाचे प्राचार्य श्री बिल्लारी सर यांची उपस्थिती होती.शाळेत विविध स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक श्री काळे सर,प्रमुख पाहुणे जिल्हा स्काऊट गाईड चे आयुक्त श्री राजेश गावंडे साहेब, जेष्ठ शिक्षक रमेशरावजी घुगे सर,यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री घुगे सर,जेष्ठ शिक्षिका पऱ्हाते मॅडम तसेच शाळे चे सर्व शिक्षकवृंद यांनी. सहकार्य केले