सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

चंद्रपूर : धनोजे कुणबी प्रणित भूमिपुत्र युवा एकता बहुउद्देशीय संस्था चंद्रपूरच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुबाला मदत तसेच महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजतापासून प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहामध्ये भूमिपुत्र सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुणबी समाज मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, तर उद्घाटक म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहरराव पाऊणकर उपस्थित राहणार आहे. यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, माजी नगराध्यक्ष तथा गटनेते डॉ. सुरेश महाकुलकर, संस्कार कॉन्व्हेंटचे संचालक उमाकांत धांडे उपस्थित राहणार आहे. सायंकाळी ५ वाजता बक्षिस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाहक सुधाकर अडबाले तर उद्घाटक म्हणून वरोरा धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष रमेश राजूरकर, विशेष अतिथी म्हणून कृउबासचे उपसभापती रणजीत डवरे, उपमहापौर राहूल पावडे, उद्योजक पंडीत काळे, समाजसेवक श्यामकांत थेरे आदी उपस्थित राहणार आहे. मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती भूमिपुत्र युवा एकता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com