सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com
*तमाम महिलावर्गाची दिलगिरी, अखेर इंदोरीकर महाराजांकडून दिलगिरी व्यक्त!* वर्धा जिल्हा प्रतिनिधी पवन चंबुलवार :-

शिर्डी : सम-विषम तिथीवरुन मुलगा-मुलगीबाबत भाष्य करुन वादात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. “समाज माध्यमात माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. 26 वर्षाच्या किर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन , समाजसंग्रह , अंधश्रद्धा निर्मूलन विवीध जाचक रुढी परंपरा यावर मी भर दिला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. तमाम महिलावर्गाची दिलगिरी”, असं इंदोरीकर महाराजांनी म्हटलं आहे. इंदोरीकर महाराजांनी पत्रक प्रसिद्ध करुन दिलगिरी मागितली आहे. नेमकं काय म्हणाले होते इंदोरीकर महाराज? इंदोरीकर महाराजांनी आपल्या एका कीर्तनात मुलगा होण्यासाठी आणि मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी शा


रीरिक संबंध ठेवण्याबाबत वक्तव्य केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत इंदोरीकर म्हणाले, “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते.”
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com