सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*अल्पवयीन मुलीस पळवुन नेणारा आरोपी गाजीयाबाद येथुन स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात.* 


 वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-

 पो.स्टे. वडनेर येथे दिनांक 10.12.2019 रोजी फिर्यादी राजु देवरावजी सेलवटकर वय 45वर्ष रा धानोरा यांनी तक्रार दिली की, की त्यांची मुलगी ही डाॅ आंबेडकर विद्यालय हिंगनघाट येथे 12 व्या वर्गात षिक्षण घेत असुन ती दररोज धानोरा ते हिंगनघाट.बस ने प्रवास करुन काॅलेज करायची ती दि. 09.12.19 ला सकाळी 07.00 वा. काॅलेज ला गेली पंरतू ती घरी न आल्याने तीचा शोध घेतला असता मिळुन न आल्याने पो.स्टे. वडनेर येथे अप क्र. 360/2019 कलम 363 भादवि चा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. सदरची बाब ही अत्यंत गंभीर स्वरुपाची असल्याने मा. पोलीस अधीक्षक सा. वर्धा यांचे आदेषान्वये स्थानिक गुन्हे षाखा वर्धा कडुन समांतर तपास करुन विषेश पथक तयार करुन तांत्रीक बाबींची पडताळणी करण्यात आली व मिळालेल्या माहितीच्या आधारे सदरची मुलगी ही वैषाली सेक्टर 3, गाजीयाबाद, उत्तर प्रदेष येथे असल्याचे समजल्याने तात्काळ स्थानिक गुन्हे षाखेचे विषेश पथक गाजीयाबाद येथे रवाना करण्यात आले. गाजीयाबाद येथे पथकाने मुलीचा षोध घेण्याकरीता परीसरात माहिती काढली असता मुलगी आरोपी मनिश मुलचंद कुषवाह याचे सोबत असल्याचे समजल्याने मुलगी व आरोपी यांना विचारपुस करुन ताब्यात घेण्यात आले. तसेच मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करुन आरोपी मनिश मुलचंद कुषवाह वय 24 वर्श यास अटक करण्यात आली. पुढील तपास पो.स्टे. वडनेर करत आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक डाॅ. बसवराज तेली, व अपर पोलीस अधीक्षक निलेष मोरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. निलेष ब्राम्हणे, निर्देषानुसार सफौ अषोक साबळे, नापोषि निलेष कट्टोजवार, अविनाष बन्सोड, नितीन मेश्राम, रामकिषन इप्पर, मपोषि षारदा स्था.गु.षा वर्धा यांनी केली.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com