*प्रकाश आंबेडकरांना धक्का, वंचित बहुजन आघाडीतील 45 नेते-पदाधिकार्यांचा राजीनामा* वर्धा जिल्हा प्रतिनिधी: पवन चंबुलवार :-
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पक्षातील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बंडामुळे मोठा झटका बसला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राज्यभरातील प्रमुख 45 नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा आणि पक्षाचा राजीनामा सामूहिकपणे आंबेडकरांना पाठविला आहे. *राजीनामा देणाऱ्या प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अकोल्यातील माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांचा समावेश आहे. यासोबतच पक्षाचे सरचिटणीस नवनाथ पडळकर, अर्जून सलगर यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी वंचित बहुजन आघाडीला शेवटचा 'जय भिम' केला आहे. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या 'महाविकास आघाडी'सह भाजपला पर्याय निर्माण करण्याचे आंबेडकरांचे प्रयत्न आहेत. मात्र, राज्यातील तिसऱ्या राजकीय शक्तीचं स्वप्नं पाहणाऱ्या आंबेडकरांच्या प्रयत्नांना या सामूहिक बंडामूळे मोठी खिळ बसली आहे.*
