*सामाजिक परिवर्तन व सवांद कार्यक्रमाचे* वर्धा जिल्हा प्रतिनिधी पवन चंबुलवार :-
आयोजन ( दि. १५.०२.२०२० ) शिवसेना वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख (माजी खासदार) *मा.श्री.अनंतरावजी गुढे* तथा शिवसेना वर्धा जिल्हा प्रमुख *प्रशात (बाळा)शहागडकर* यांच्या नेतृत्वात. आर्वी :- सध्याच्या सामाजिक परिस्थितीचा विचार केल्यास सर्वत्र वैचारिक प्रदूषण झाल्याचे दिसून येत आहे. अश्या भीषण परिस्थिती मध्ये सामाजिक कर्तव्य म्हणून काही बदल व्हावा व निकोप शुद्धतम वैचारिक जागृती व्हावी ह्या उद्देशाने सामाजिक परिवर्तन व सवांद कार्यक्रमाचे आयोजन *सौ.सविता राजेंद्र पुरी* , उपजिल्हा संघटक शिवसेना महिला आघाडी जि.वर्धा यांनी आर्वी येथील सावजी रेस्ट्रारेंट येथे केले होते. आयोजित कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख *श्री बालाभाऊ शाहागडकर* अध्यक्ष म्हणून तर *डॉ.महेंद्र गुढे* , *डॉ.वंदना गुढे प्रमुख* वक्ते तसेच श्री देशमुख सर कराटे प्रशिक्षक समुपदेशक व सामाजिक कार्यकर्ते *डॉ.प्रसन्न कुमार बंब* उपस्थित असून यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला. मुलींनी कराटे शिकावे व आत्मसंरक्षण करणे बाबत श्री देशमुख सरांच्या चमूने प्रत्यशिक दाखविले . तसेच *डॉ.महेंद्र गुढे , *डॉ.वंदना गुढे* व डॉ. बंब यांनी कार्यक्रमातील लोकांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे अध्यक्ष *श्री बालाभाऊ शाहागडकर* यांनी महिलांच्या सुरक्षेविषयी महत्व पूर्ण माहिती दिली.याप्रसंगी उपस्थितानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे यशस्वी करिता *शिवसेना तालुका प्रमुख श्री गणेशजी आजने* यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सौ.मंजुषा एलचटवार यांनी केले तर प्रास्ताविक सौ. सविताताई पुरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सौ.मीनाताई ठाकरे, शीतल ईसासरे, अर्चना दाभाडे , जयश्री लांबाडे , रंजना इजापुरे , बेबीताई नाबळे , वैशाली कदम ई. योगदान दिले. कार्यक्रमाचे सकारात्मक पडसाद विद्यार्थी व पालक तसेच महिला वर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे.
