*भटके विमुक्त विभागाचे नाव बदलणार्या राज्य सरकारचा जाहिर निषेध....* ==================== *वाशिम जिल्हा प्रतिनिधी चेतन कै.बांगर*
इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे नाव आता " *"बहुजन कल्याण विभाग"* करण्यात आल अाहे याबद्दल या सरकारचा जाहिर निषेध ! मुळात अाजही भटका विमुक्त समाज प्रचंड मागासलेला अाले.१९९९ ला लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांनी इदाते समिती(१९९९) च्या अहवालानुसार भटके विमुक्तांच्या कल्याणासाठी वेगळा विभाग,मंत्रालय व संचलनालय स्थापन केले होते.परंतू सरकार जातात नेहमीच भटके विमुक्तांच्या व औबीसींच्या विरोधी राजकारण करणार्या काँग्रेस व रा.काँ.पक्षाने १५वर्ष हा विभाग अाणि खाते बंदच करुण टाकले होते.ते मंत्रालय पून्हा २०१५ मध्ये चालू केले होते. परंतू अाता पून्हा एकदा हा निंदनिय प्रकार चालू झाला अाहे.स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा अाता कुठे केंद्रिय स्तरावर या समाजाला वेगळी ओळख मिळत असताना ते पुसण्याचे पापया सरकारने केले अाहे.स्वत:ला भटक्या विमुक्तांचे कैवारी म्हटणारे सरकारमधिल मंत्री काय भूमिका घेणार अाहेत ? का सत्तेच्या मलिद्यासाठी गप्प बसणार नाही यांना गोष्टीचा जाणीव भटक्या विमुक्त जातीच्या जनतेने घेणे गरजेचं असल्यामुळे वंजारी सेवा संघ(असो.)महाराष्ट्र राज्य शाखा औरंगाबाद च्या वतीने सर्व भटक्य जमाती व विमुक्त जातीवर होत असलेल्या अन्यया विरुद्ध सरकार ने घेतलेल्या निर्णयाचा जाहीर निषेध व्यक्त.केला
