सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ज्ञानेश घुगे विजयी* ================== वाशिम जिल्हा प्रतिनिधी :-. चेतन कै. बांगर ================= वाशिम:- 


वाशीम जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने दिनांक 7 व 8 फेब्रुवारी 2020 रोजी *राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा* आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत दि. 7/2/2020 रोजी एकेरी बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आली.15 वर्षा खालील गटात ज्ञानेश संजयराव घुगे विजयी झाला. त्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस 3000/- रुपये व विजयी ट्रॉफी देण्यात आली. तसेच दिनांक 8/2/2020 रोजी दुहेरी बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आली. 15 वर्षा खालील गटात ज्ञानेश संजयराव घुगे व सानिध्य एकाडे प्रथम क्रमांक घेऊन विजयी झाले. यामध्ये प्रथम बक्षीस 5000 /-रुपये व ट्रॉफी देण्यात आली. ज्ञानेश च्या या विजया बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आहे.

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com