*स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज* वर्धा जिल्हा प्रतिनिधी:पवन चंबुलवार :-
यांच्या जयंती निमीत्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा *जय भिम जय शिवराय युथ फाऊंडेशन* च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुद्धा युथ फाऊंडेशन च्या वतीने छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त भोजनदानाचा कार्यक्रम स्थानिक साई मंदिर परिसरातील अनाथ वृद्धांना भोजनदान करून साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात कधीही रयत उपाशी झोपली नाही त्याच विचारावर पाऊल ठेवून युथ फाऊंडेशन च्या वतीने एक छोटासा उपक्रम घेण्यात आला. त्यावेळी जय भीम जय शिवराय युथ फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शिवम टोणपे, जिल्हाध्यक्ष गौरव दाखोले, आशिषभाऊ लोखंडे, वैष्णव देशमुख, सनी पाटील, आदित्य देशमुख, शौनक वानखेडे, श्रेयस पाटणकर, अक्षय बहिरमवार, सौरभ पिंजारी, प्रतीक गायकवाड, मयुर महाजन, आकाश पाटमासे,अक्षय पाटील व युथ फाऊंडेशन चे कार्यकर्ते उपस्थित होते.
