सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

*महिला अत्याचार प्रकरणासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करा :- आमदार प्रतिभाताई धानोरकर* चंद्रपूर :-


 महाराष्ट्रात वाढत्या अत्याचाराचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र न्यायालय सुरू करण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. आज मर्दानी महिला आस्था मंचाच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. अलीकडेच हिंगणघाट येथे एका शिक्षिकेवर पेट्रोल टाकून तिला जाण्याचा प्रकार घडला. महाराष्ट्रत अत्याचार, बलात्कार, हत्या या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनेतील आरोपींना तात्काळ शिक्षा होत नसल्यामुळे पीडितांना न्याय मिळत नसल्याचे दिसून येत आहे. या घटनांवर अंकुश टाकण्यासाठी स्वतंत्र न्यायालय त्यामध्ये महिलांवर होणारे अत्याचार, बलात्कार, हत्या, महिलावरील हिंसा, जडित प्रकरणासाठी ताबडतोब निर्णय करावे. त्यामध्ये ज्येष्ठ व कर्तव्यदक्ष न्यायाधीशाची नेमणूक करावी. या न्यायालयाचा निकाल 21 दिवसाच्या आत करण्यात यावा. या न्यायालयाचा निर्णय अंतिम ठेवण्यात यावा. अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. मर्दानी महिला आस्था मंचातर्फे जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मर्दानी महिला हस्त मंचाचे अध्यक्ष माजी आमदार शोभाताई फडणवीस, उपाध्यक्ष डॉक्टर रजनीताई हजारे, माजी महापौर अंजलीताई घोटेकर, सचिव एड. विद्या मसदे, शोभाताई पोटदुखे, विमल गाडेकर, नंदाताई अल्लूरवार, प्रभाताई चीलके यांच्यासह शेकडो महिलांची उपस्थिती होते.
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com